शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर सुरक्षा ; पोलिसांची अतिदक्षता मोहीम : सागरी सुरक्षेचा घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:59 IST

मालवण : २६/११ सारखे दहशतवादी हल्ले समुद्रातच परतवून लावण्यासाठी सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. या सागरी सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.

ठळक मुद्देमालवणात शुक्रवारी किनारपट्टीवर विशेष मोहीम किनारपट्टीवर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण

मालवण : २६/११ सारखे दहशतवादी हल्ले समुद्रातच परतवून लावण्यासाठी सागरी सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे. या सागरी सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर विशेष अशा अतिदक्षता मोहिमेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांनी मालवणात शुक्रवारी किनारपट्टीवर विशेष मोहीम राबविली.

बुधवारी २० रोजी या मोहिमेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या हस्ते करण्यात सिंधुदुर्ग नगरी येथे करण्यात आला होता. त्यानंतर ३ दिवस पोलीस अधीक्षक कार्यालयात सागरी सुरक्षेच्यादृष्टीने शोध बचाव व मुकाबला याबाबतचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले.

या तीन दिवसीय प्रशिक्षणा नंतर शुक्रवारी मालवण किनारपट्टीवर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवाद्यांशी कसा सामना करायचा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.या प्रात्यक्षिक कार्यक्रमात पोलिसांच्या तीन स्पीड बोट, प्रतिकात्मक स्वरूपात आतंकवाद्यांची बोट मोहिमेत होती. सागरी सुरक्षेच्यादृष्टीने किनारपट्टीवरील पोलीस अधिकाºयांना गुजरात येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या प्रशिक्षणा नुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी किनारपट्टीवर ही विशेष मोहीम राबविल्याची माहिती अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.अधिकारी सहभागीयावेळी सिंधुदुर्ग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, रत्नागिरी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, मोरे, गवस, कोस्टगार्ड कमांडर अभिषेक करूणाकर, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, २० अधिकारी, ३३ कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.